भक्तनिवास
श्री गजानन महाराजांच्या मुळ प्रासादिक पादुका व काही काळ वास्तव्याने पुनीत झालेल्या मुंडगांवला विशेष
महत्व प्राप्त झाले. श्री झामसिंग महाराज यांच्या विनंती वरुन श्री गजानन महाराज यांनी मुंडगांवला काही
काळ वास्तव्य केले.
त्यामुळे श्री झामसिंगांनी आपली सर्व संपत्ती श्रींचे चरणी अर्पण करुन पुण्य कमाविले.
आजही हजारो भक्त मुंडगांवला दर्शनास येत असतात.
भक्तांना या पावन भुमित मुक्काम करण्याची इच्छा असते. त्या करीता संस्थानच्या कडून भक्तांच्या मदतीने १६
खोलयांचे "भक्त निवास "निर्माण करण्याचे योजिले आहे संस्थानच्या "श्री झामसिंग महाराज संकुल" या अडीच
एक्कर जागेत शासनाच्या तिर्थक्षेत्र "ब" विकास अंतर्गत २ कोटी रुपये निधी मधुन भव्य सभागृह व स्वच्छता
गृहा चे बांधकाम सुरु आहे. या जागेतच नियोजित भक्त निवास होणार आहे
भक्तांच्या सुविधे करीता, संत नगरीतील पवित्र भुमित होणाऱ्या भक्त निवास मधिल प्रत्येक खोली करीता ४ लक्ष
रुपयांची मदत देणगी अपेक्षीत आहे. या खोली वर सौजन्य म्हणून देणगी दात्यांच्या नावाची पाटी राहणार असुन,
उत्सवाचे वेळी त्या देणगी दात्यांकरीता ती खोली आरक्षीत राहील.
भक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया आप्तांच्या स्मृती प्रित्यर्थ किंवा मित्र परिवार मिळुन खोली
करीता देणगी देवून उपकृत करावे ही नम्र विनंती.
- टीप
- - मंदिरातील प्रासादीक पादुका बाहेरगांवी कुठेही दर्शनार्थ नेल्या जात नाही
- - संस्थानला देण्यात येणारी राशी 80G अंतर्गत आयकर मुक्त आहे.